गावाची माहिती
वाघंबा : वाघंबा हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील बागलाण तहसीलमधील एक गाव आहे.वाघंबा हे गाव मोसम नदीच्या आजूबाजूला बसलेले आहे,मौसम नदीचे उगमस्थान साल्हेर किल्ल्याच्या माथ्यावरून गंगा जमुना असे दोन टाके आहेत तेथून उगम झालेला आहे. वाघंबा गावाचा मुख्य व्यवसाय शेती व शेतमजूरी करतात, बाघंबा गावाची मुख्ये पिके खरीप व रब्बी घेतले जातात खरीप पिके= भात ,नागली,सावा, वरई , उडीद, भुईमुग,खुरसानी, इत्यादी रब्बी पिके=गहु,हरभरा,मसुर,वाटाणा, इत्यादी. वाघंबा हे उपजिल्हा मुख्यालय सटाणा (तहसीलदार कार्यालय) पासून ४५ किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय नाशिक पासून ८५ - ९० किमी अंतरावर आहे. २००९ च्या आकडेवारीनुसार, वाघंबा गाव देखील एक ग्रामपंचायत आहे २०११ च्या जनगणनेनुसार, वाघंबाचा स्थान कोड किंवा गाव कोड ५५००१८ आहे. हे गाव एकूण ८७७ हेक्टर क्षेत्रफळ व्यापते. सर्व प्रमुख आर्थिक घडामोडींसाठी सटाणा हे वाघंबा गावापासून सर्वात जवळचे शहर आहे, जे अंदाजे ४५ किमी अंतरावर आहे.
वाघंबा हे गाव सयाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली होते साधारणता 1881 ते 1950 ह्या काळात गुजराती वाचन लिखाण करणारे कर्मचारी होते वाघंबा गावाला पूर्वी तहसील साल्हेर होते आणि जिल्हाधिकारी सोनगड व्यारा येथे होते. वाघंबा गावाच्या पूर्वेला भीमखेत गाव आहे, पश्चिमेला गुजरात राज्य सीमा आहे, दक्षिणेला साल्हेर सालोटा किल्ला व पाच पांडव डोंगर रांगा आहे,उत्तरेला बाभुळणे शिवार आहे. वाघंबा गावात पाझर तलाव एक आहे त्यात वर्षभर पाणी राहते व त्या पाण्याचा उपयोग गुरांसाठी होतो, वाघंबा गावाची कुलदैवत डोंगऱ्या देव आहे गाव गड =रवान्यागड ग्रामदैवत मारुती मंदिर, सप्तशृंगी देवी मंदिर वाघंबा गावात झाडे झुडपे त्यांची नावे आंबा आवळा करवंद जांभूळ पळस हिरडा बेहडा सादडा धांबडा सावर पायर आमसर कुडी, इतर..
स्थानिक प्रशासनाच्या बाबतीत, वाघांबे गावाचे प्रशासन भारताच्या संविधान आणि पंचायती राज कायद्यानुसार गावाचा निवडून आलेला सरपंच करतो. हे गाव राज्यस्तरीय प्रतिनिधित्वासाठी बागलाण विधानसभा मतदारसंघ आणि राष्ट्रीय संसदीय निवडणुकांसाठी धुळे लोकसभा मतदारसंघात येते. स्थानिक प्रशासन गावातील नागरी सेवा आणि विकासासाठी जबाबदार आहे.