महाराष्ट्र शासन GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra emblem

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत वाघंबा

Gram Panchayat Waghamba

अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास

✓ उद्देश

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक दलित वस्त्यामध्ये स्वच्छता विषयक सोयी, समाजमंदीर, अंतर्गत रस्ते, नळपाणी पुरवठा इत्यादी सुविधा उपलब्ध करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही योजना राबविण्यात येते.

✓ लाभाचे स्वरुप

शासन निर्णय दि. ५ डिसेंबर २०११ अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदान देण्यात येते.

सदर प्रस्ताव योग्य त्या कागदपत्रांसह ग्रामपंचायतीने तयार करून गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. तसेच शासन शुध्दीपत्रक दिनांक ३१ डिसेंबर २०११२ जुलै २०१२ अन्वये कामाची निवड करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीला देण्यात आलेले आहेत.